म्युकरमायकोसिस
म्युकरमायकोसिसई सकाळ

म्युकरमायकोसिस ः लोणीत पाच महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

अहमदनगर/शिर्डी ः म्युकरमायकोसीस कोविडपश्चात होणारा आजार अशीच समज आतापर्यंत होती. परंतु कोविडची लागण न होताही एका चिमुरडीला या आजाराने ग्रासले. त्यातच तिचे निधन झाले. या घटनेने पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. लोणीतील (राहाता) प्रवरा ग्रामीण रूग्णालयात ही घटना आज सकाळी घडली.

श्रद्धा पोरके (वय पाच महिने, शिर्डी) असे त्या मुलीचे नाव आहे. या चिमुरडीला २७ तारखेला जुलाब उलाट्याचा त्रास होऊ लागला. तिचे वडील वसंत पोरके यांनी तिला कोपरगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तीन दिवसांतही तिच्या आरोग्यात फरक पडला नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी एक जूनला प्रवरा ग्रामीण रूग्णालयात भरती केले. परंतु दोन जूनला परत तिला कोपरगावला उपचारासाठी नेले. (Mucor mycosis: Five-month-old girl dies at Pravara Hospital)

तेथे गेल्यानंतरही त्या चिमुरडीची तब्येत काही सुधारू शकली नाही. त्यानंतर तिच्या पालकांनी नाशिक येथे हलवण्याचा निर्णय घेतला. तेथे एका खासगी रूग्णालयात नेले. मात्र, ती उपचारास दाद नसल्याने डॉक्टरांनी कोविडची टेस्ट करण्याचा सल्ला दिला. इतरही काही टेस्ट केल्यानंतर तिच्या शरीरात अँटी बॉडीज आढळून आल्या. त्यामुळे डॉक्टरांनी अलर्ट होत इतर तपासण्या केल्या असता म्युकरमायकोसिस झाल्याचे निष्पन्न झाले.

त्या चिमुरडीचे वडील मजूर आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे. नाशिकमध्ये काही दिवस उपचार केले. परंतु त्यांना खर्च पेलवेना म्हणून त्यांनी पुन्हा लोणीतील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात १० जून रोजी दाखल केले. तेव्हापासून त्या चिमुरडीची मृत्यूशी झुंज सुरू होती. आस सकाळी तिची प्राणज्योत मालवली.

आरोग्य विभाग अनभिज्ञ

म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात बरेच रुग्ण आहेत. परंतु त्यांची आकडेवारी आरोग्यविभागाकडे नाही. या रूग्णांबाबत फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याने ही स्थिती आहे. या बाबत केसबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांबरोबर संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी अशी काही घटना घडली असल्याचे आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.

म्युकरमायकोसिस आजार कोविडच्या काळात जास्त प्रमाणात उदभवला आहे. उपचारादरम्यान स्टेरोईड दिले जात असल्याने हे रूग्ण आढळून येत आहेत. शरीरातील रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा आजार बळावतो. या पूर्वीही म्युकरमायकोसिस होता. परंतु त्याचे प्रमाण अगदी नगण्य होते.

- संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नगर.

(Mucor mycosis: Five-month-old girl dies at Pravara Hospital)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com