कपडे, चप्पल काढली, बॅग ठेवली नि मग मुळा नदी टाकली उडी

विलास कुलकर्णी
Tuesday, 22 September 2020

मुळा धरणातून नदीत 12 हजार क्‍यूसेकने पाणी सोडले आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहते आहे. आज सकाळी अज्ञात तरुण पुलावर आला. 15-20 मिनिटे रेंगाळला.

राहुरी : नगर-मनमाड महामार्गावरील पुलावरून अज्ञात तरुणाने आज सकाळी साडेअकरा वाजता मुळा नदीत उडी घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात येत होता. 

मुळा धरणातून नदीत 12 हजार क्‍यूसेकने पाणी सोडले आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहते आहे. आज सकाळी अज्ञात तरुण पुलावर आला. 15-20 मिनिटे रेंगाळला.

नंतर पुलाच्या कठड्याजवळ उभा राहून कपडे काढले. टी-शर्ट व पॅंट कठड्यावर ठेवली. बॅग व चप्पल तेथेच ठेवली. मग कठड्यावर चढून त्याने नदीत उडी मारल्याचे जुन्या पडक्‍या पुलाजवळ पोहणाऱ्या तरुणांनी पोलिसांना सांगितले.

काही तरुणांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र 50 फुटांपर्यंत गटांगळ्या खात जाऊन तो पुढे दिसेनासा झाला. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. घटनास्थळी तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, तलाठी अभिजित क्षीरसागर यांनी धाव घेतली. 

पालिकेचा अग्निशामक बंब बोलाविला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शोधकार्य सुरू केले. नाव घाट व गणपती घाट परिसरात नदीत शोध घेतला. मात्र, वेगात प्रवाह सुरू असल्याने शोध लागला नाही. त्याच्या पिशवीतही ओळखीचा पुरावा आढळला नाही. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mula carried the young man into the river