‘मुळा’त ८९२ क्यूसेकने पाण्याची आवक; धरण पन्नास टक्के भरले

Mula Dam
Mula Dam

राहुरी (जि. नगर) : नगर जिल्ह्यातील सर्वांत मोठे मुळा धरण आज (सोमवार) सकाळी सहा वाजता ५० टक्के भरले. लहित खुर्द (कोतूळ) येथे मुळा नदीपात्रातून चार हजार ८९२ क्यूसेकने धरणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणसाठा १३ हजार ५३ दशलक्ष घनफूट झाला आहे. (Mula dam is receiving 892 cusecs of water)

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हरिश्चंद्रगडावर मागील सहा-सात दिवसांपासून दररोज कमी-अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणात नवीन पाणीसाठा जमा होत आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. मागील पाच वर्षांत सन २०१८ चा अपवाद वगळता धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे यंदा धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मुळा धरणामुळे राहुरी, नेवासे, पाथर्डी व शेवगाव तालुक्यांतील ८५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या नगर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या मुळा धरणावर लाखो शेतकऱ्यांचा प्रपंच अवलंबून आहे. पिण्याच्या पाणी योजना व औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा यामुळे मुळा धरण दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायीनी ठरली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.



मागील पाच वर्षांत ५० टक्के भरल्याची तारीख व धरणसाठा असा (दलघफूटमध्ये) :
२०१६ ... १७ जुलै ... १३,१२६
२०१७ ... २३ जुलै ... १३,७३७
२०१८ ... २२ जुलै ... १३,०९०
२०१९ ... १ ऑगस्ट ... १३,०९०
२०२० ... ८ ऑगस्ट ... १३,३८२
२०२१ ... २६ जुलै ... १३,०५३

(Mula dam is receiving 892 cusecs of water)

Mula Dam
कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तरी भरचौकात मारू : आमदार काळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com