Mula Dam Wate : मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे उघडले; नदीपात्रात २,५०० क्यूसेकने पाणी सोडले

Mula Dam Water Release, 11 Gates Open, Rahuri Drought अंतर्गत मुळा धरणाचे सर्व ११ दरवाजे ३ इंचाने उघडून मुळा नदीपात्रात २,५०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.
Mula Dam Water Release, 11 Gates Open

Mula Dam Water Release, 11 Gates Open

esakal

Updated on: 

राहुरी, : मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे आज (शुक्रवारी) सकाळी ९ वाजता ३ इंचाने उघडण्यात आले. मुळा नदी पात्रातील चार बंधारे भरण्यासाठी धरणातून २५०० क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने मुळा नदीपात्रात पाणी झेपावले. धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार आहे. ‌धरणातून नदीपात्रात ५० ते ५५ तास विसर्ग चालणार आहे. राहुरी तालुक्यात मागील सलग ७५ दिवसांपासून पाऊस खंडित झाला आहे

. त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळाच्या पहिल्या ट्रिगरमध्ये राहुरी तालुक्याचा समावेश झाला आहे. अत्यल्प पावसामुळे यंदा धरण भरले नाही. त्यामुळे धरणातून नदीपात्रात पाणी गेले नाही. परिणामी, मुळा नदीकाठातील गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मुळा नदीपात्रात तत्कालीन आमदार प्रसाद तनपुरे यांनी दूरदृष्टीने कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची मालिका उभारली आहे.

धरणापासून मुळा नदीपात्रात डिग्रस (३.५ किलोमीटर), मानोरी (२२ किलोमीटर), मांजरी (२८ किलोमीटर), वांजुळपोई (३६ किलोमीटर) बंधारे उभारण्यात आले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुळा व प्रवरा नदीपात्रातील बंधारे भरून देण्याच्या सूचना जलसंपदा खात्याला दिल्या होत्या. मुळा पाटबंधारे विभागाने नदीपात्रातील बंधारे ''टेल टू हेड'' भरण्याचे नियोजन केले आहे. कार्यकारी अभियंता सायली पाटील, राहुरीचे उप‌अभियंता विलास पाटील, मुळा धरण शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांच्या अधिपत्याखाली बंधाऱ्यांच्या फळ्या टाकणारे दोन पथके व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com