

Mula Dam’s 65-day irrigation cycle ends after around 8.5 TMC of water was used.
esakal
सोनई : राहुरी, नेवासे, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यासाठी मुळा धरणाच्या ५४ वर्षांच्या इतिहासात सर्वात मोठे शेतीकरिताचे आवर्तन अखेर ६५ दिवसांनंतर बंद झाले. पावसाळ्यात सोडलेल्या खरिपाच्या आवर्तनात साडेआठ टीएमटी पाणी धरणातून कमी झाले. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्तन भेटण्याची शक्यता मावळली आहे.