
सोनई : राहुरी, नेवासे, पाथर्डी व शेवगाव तालुक्यासाठी तारणहार असलेल्या मुळा धरणातून रब्बीचे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांचे चेहरे खुलले आहेत. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुळा धरणातून रब्बीचे आवर्तन देण्याची सूचना केल्यानंतर आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मुळा धरण येथे कळी दाबून कालव्याला आवर्तन सोडले होते.