Ahmednagar News : मुळा धरण निम्मे भरले, नगर जिल्ह्याची मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम

या वर्षी आजपर्यंत धरणात चार हजार ५०५ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले.
Mula-Dam
Mula-DamSakal

राहुरी : नगर जिल्ह्यातील सर्वांत मोठे मुळा धरण आज (सोमवारी) निम्मे भरले. सकाळी सहा वाजता धरणसाठा १३ हजार १०८ दशलक्ष घनफूट (५०.४१ टक्के) झाला. या वर्षी आजपर्यंत धरणात चार हजार ५०५ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले. मात्र, धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रात मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

या वर्षी उशिराने पावसाला सुरवात झाली. जून महिन्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची कामगिरी साधारण राहिली. जुलै महिन्याच्या सुरवातीला धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली. त्यावेळी धरणसाठा मागील वर्षीपेक्षा एक हजार दशलक्ष घनफूट जास्त होता. आज धरण ५० टक्के भरले, तरी मागील वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेचा धरणसाठा चार हजार ८९४ दशलक्ष घनफूट कमी आहे.

धरणाच्या पाणलोटात २५ जुलैनंतर जोरदार पाऊस सुरू होतो, असा यापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असा विश्वास मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी व्यक्त केला आहे. आज (सोमवारी) सकाळी सहा वाजता लहीत खुर्द (कोतूळ) येथील सरितामापन केंद्रापासून मुळा धरणात सहा हजार ५९२ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, २०१९ ते २०२२ दरम्यान सलग चार वर्षे धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहिले. सलग पाचव्या वर्षी धरण भरावे, अशी अपेक्षा लाभक्षेत्रातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

मागील पाच वर्षांचा धरणसाठा (दशलक्ष घनफूट)

आजच्या तारखेचा (२४ जुलै)

अ.नं. - वर्ष - साठा

१. २०१८ - ८२६८ (३१.८०%)

२. २०१९ - १४३९७ (५५.३७%)

३. २०२० - ९८९८ (३८.०६%)

४. २०२१ - १२२६५ (४७.१७%)

५. २०२२ - १८००२ (६९.२३%)

६. २०२३ - १३१०८ (५०.४१%)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com