
अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांच्या वीजबिल खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने शहरात अमरधाम, सावेडी व बुरूडगाव कचरा डेपो, तसेच मलनिःस्सारण प्रकल्प असे चार ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज तेथील प्रकल्पातच वापरली जाणार आहे. या माध्यमातून महानगरपालिकेचे सुमारे ४ कोटी २० लाख रुपयांचे वीजबिल वाचणार आहे. लवकरच हे प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.