सावधान ! नायलॉन मांजा विकाल तर कारवाईला सामोरं जावं लागेल

गौरव साळुंके 
Thursday, 31 December 2020

प्रशासनाने दोन वर्षापासून नायलॉन मांजावर बंदी घातल्याने यंदा बाजारातील नॉयलॉन मांजा कमी झाला आहे. बाजारात रंगबेरंगी आकर्षक पतंगही ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. प्लॅस्टिक पतंगची क्रेजही सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात सजली आहेत. परंतु, बंदी असलेल्या नायलॉन मांजासह प्लॅस्टिक पतंग विक्रीवर नगरपालिकेच्या पथकाकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. शहरातील पतंग विक्रेत्यांनी नॉयलॉन मांजासह प्लॅस्टिक पतंग विक्री केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

हे ही वाचा : सध्या शरद पवारांनी शेतकरी कायद्याविरुद्ध घेतलेला पवित्रा ही त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे, अशी टीका पाशा पटेल यांनी केली

प्रशासनाने दोन वर्षापासून नायलॉन मांजावर बंदी घातल्याने यंदा बाजारातील नॉयलॉन मांजा कमी झाला आहे. बाजारात रंगबेरंगी आकर्षक पतंगही ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. प्लॅस्टिक पतंगची क्रेजही सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्लॅस्टिकवर बंदी असतानाही शहरातील ठराविक भागात पतंग विक्रेते प्लॅस्टिक पतंगाची विक्री करीत असल्याचे दिसत आहे. नायलॉन मांजा आणि प्लॅस्टिक पतंग विक्री केल्यास संबंधित विक्रेत्यावर नगरपालिका कारवाई करुन पाच हजारांचा दंड वसूल करणार आहे.

हे ही वाचा : सावळीविहिर ते कोपरगाव रस्त्यासाठी 19 कोटी मंजूर ; आमदार आशुतोष काळे यांची माहिती, नवीन वर्षात नागरिकांना आणखी एक मिळणार भेट

गेल्या वर्षी शहरातील मोरगेवस्ती आणि मिल्लतनगर परिसरात नायलॉन मांजा अडकून दोन दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. तसेच दरवर्षी शहर परिसरात नॉयलॉन मांजा अडकून अनेक पक्षी जखमी होतात. त्यामुळे मांजा विक्री आणि वापरावर बंदी घालण्यासाठी पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईची कठोर भूमिका घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The municipality has warned that kite sellers in the city of Shrirampur will be penalized if they sell plastic kites with nylon manja