
अहिल्यानगर : जुन्या वादातून १९ वर्षीय तरूणाचे अपहरण करून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह केकताई परिसरात डिझेल टाकून जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैभव शिवाजी नायकोडी (वय १९, रा. ढवणवस्ती, सावेडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. जुन्या वादातून हा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.