
अकोले : तालुक्यातील भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील मुरशेतच्या डोंगरावर ३१ डिसेंबरला रात्री जंगलाला मोठी आग लागली. ही आग जलदगतीने पसरत होती. वन कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून धोका पत्करून रात्री बाराच्या सुमारास आग आटोक्यात आणली. ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल दहा एकर क्षेत्रावरील आग आटोक्यात आणली.