solapur
solapursakal

Nagar Crime : पाच वर्षांपासून फरार असलेल्या मिथून काळेस आखोणीत अटक

यांच्याकडून तीन लाख ४८ हजार १०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन, घड्याळ व कार दरोडेखोरांनी बळजबरीने चोरुन नेले होते.

Nagar Crime - मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. मिथुन बंड्या काळे (वय ३०, रा. आखोणी, ता. कर्जत) असे त्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

दत्तात्रय बंडू ननवरे (वय ४८, रा. दौंड, जि. पुणे) हे कारमधून कुटूंबासह चालले होते. श्रीगोंदे तालुक्यात काष्टी ते दौंड रस्त्यावर त्यांना ५ ते ६ अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून अडवले.

solapur
Nashik Crime News : 3 आठवडे उलटूनही वृद्धेच्या खुनाचे उलगडेना गूढ

ननवरे यांच्याकडून तीन लाख ४८ हजार १०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन, घड्याळ व कार दरोडेखोरांनी बळजबरीने चोरुन नेले होते.

याप्रकरणी ननवरे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या तपासात पाच आरोपी निष्पन्न झाले होते. त्यापैकी दोन आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली होती. इतर तीन आरोपी मात्र अद्याप फरार होते.

solapur
Mumbai Crime : कसारा स्थानकातून सराईत दरोडेखोराला अटक, एक चाकू व मोबाईल हस्तगत करण्यात आला

त्यापैकी फरार आरोपी मिथून काळे हा आखोणी (ता. कर्जत) येथे त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने आरोपी काळे याला ताब्यात घेतले. तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विरूद्ध अहमदनगर, सोलापूर व पुणे जिल्ह्यात गंभीर स्वरुपाचे दहा गुन्हे दाखल आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com