नगर जिल्ह्यात २२ जणांची कोरोनावर मात; ३९ रुग्णांची वाढ

Nagar district 22 persons defeated Corona on Friday
Nagar district 22 persons defeated Corona on Friday
Updated on

अहमदनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये शुक्रवारी (ता. १७) सकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले. तर काल रात्री उशीरा १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह  आढळून आले. यामुळे जिल्हयात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५३४ झाली आहे.  दरम्यान, आज सकाळी २२ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्जार्च देण्यात आला. जिल्ह्यात बरे होणार्‍या रुग्णांची संख्या आता ७९४ इतकी झाली असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार पारनेर तालुक्यातील तीन (साबळेवाडी ०१, नांदूरपठार ०१ आणि पळसपूर ०१). भिंगार येथील १०, नगर ग्रामीणमधील तीन (वाकोडी ०१, डोंगरगण ०१), श्रीगोंदा तालुक्यातील पाच (कोळगाव ०३, लोणी व्यंकनाथ ०२) रुग्णांचे अहवाल पॉझिटीव आढळून आले.
गुरुवारी रात्री १८ जणांचे अहवाल पॉझिटीव आढळून आले. यामध्ये संगमनेर १२ (कुरण ०२, राजापूर ०१, बागवानपुरा ०४, घुलेवाडी ०१, सय्यदबाबा चौक ३, सुकेवाडी ०१), नगर शहर ०पाच आणि अकोले एक (कळंब) असे बाधित रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण रुग्णांची संख्या १३६१ इतकी झाली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५३४ इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३३ रुग्ण दगावले आहेत तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही ७९४ इतकी झाली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Karjat Sets an Example of Humanity as Volunteers Stand by Their Sick Companion
Parents Trust the School, Infrastructure Fails the Students in Akole
Compassion in Action: Hingani Dumala Villagers Support Family After Tragic Loss
Anna Hazare’s Protest Averted as Maharashtra Govt Stays New RTI Rules
Marathi News Esakal
www.esakal.com