शेताच्या न्याय- हक्कासाठी शेतकऱ्यांने सुरु केले शेतातच उपोषण

विनायक दरंदले
Saturday, 12 December 2020

पानेगाव (ता. नेवासे) शिवारात असलेल्या वडिलोपार्जित शेतात शेतपीक घेण्यास अडचणी वाढू लागल्याने त्रस्त शेतकऱ्याने चक्क शेतातच आमरण उपोषण सुरु केले आहे.

सोनई (अहमदनगर) : पानेगाव (ता. नेवासे) शिवारात असलेल्या वडिलोपार्जित शेतात शेतपीक घेण्यास अडचणी वाढू लागल्याने त्रस्त शेतकऱ्याने चक्क शेतातच आमरण उपोषण सुरु केले आहे.

शेतकरी बाळासाहेब भाऊसाहेब नवगिरे यांची पानेगाव शिवारात गट नंबर २२०/१ ब मध्ये दोन एकर ११ गुंठे शेतजमीन आहे. अकरा वर्षापासून ते वडिलोपार्जित शेतात पीक घेत असून ते आपला परीवार व मजूरासह कपाशी पीकाची मशागत करत असताना ८ डिसेंबरला गावातीलच सात ते आठ जणांनी दमदाटी व शिवीगाळ करुन मजूरांना पळवून लावले. गेल्या महिन्यात त्याच लोकांनी माझ्या शेतात

रस्ता करण्याचा प्रयत्न केला होता, असे नवगिरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
माझ्याच शेतात पीक घेण्यास अडचण येवू लागल्याने नवगिरे यांनी सोनई पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या मात्र तरीही त्रास सुरुच असल्याने आज त्यांनी आपल्याच शेतात आमरण उपोषण सुरु केले आहे. मुख्यमंत्री, महसूलमंत्रीसह जिल्हा प्रशासनास त्यांनी निवेदन दिले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nagar district farmers started a hunger strike in the field