esakal | गुड न्यूज! नगर जिल्ह्यात आज कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त 
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar district today corona patients is higher than the corona recovered patients

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. आज सकाळच्या अहवालात एकूण 54 जणबाधीत आढळून आलेले आहेत.

गुड न्यूज! नगर जिल्ह्यात आज कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त 

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. आज सकाळच्या अहवालात एकूण 54 जणबाधीत आढळून आलेले आहेत. तर आज एकूण 133 जणांना रुग्णलयातून घरी सोडण्यात आले आहेत. 
जिल्ह्यात सोमवारी सांयकाळपासून ते आज (मंगळवार) दुपारी 12 पर्यंतच्या अहवालामध्ये कोरोना बाधीतांध्ये 54 जणांची वाढ झाल्याने जिल्ह्यात 3818 रुग्णांची संख्या झालेली असून त्यातील 2418 जण रुग्णालयातून बरे होऊन घरी परतलेले आहेत. सध्या 1346 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असून 53 जणांचा मृत्यू झालेला आहे. 
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपरपर्यंत 54 जण बाधित आढळून आले. यामध्ये नेवासे 11, संगमनेर पाच, श्रीगोंदे 10, कोपरगाव सात, पाथर्डी 10, अहमदनगर महापालिका हद्दीत आठ, नगर ग्रामीण एक, पारनेर एक, बीड एकजण बाधीत आढळून आलेले आहेत. 
दरम्यान, आज 133 रुग्णांना घरी सोडण्यात आलेले आहे. यामध्ये महापालिका हद्दीतील 34, संगमनेर सहा, राहाता आठ, पाथर्डी एक, नगर ग्रामीण 27, श्रीरामपूर दोन, कॅन्टोन्मेंट 26, नेवासे तीन, श्रीगोंदे नऊ , पारनेर दोन, अकोले आठ, राहुरी पाच, शेवगाव एक व कर्जत एक अशा रुग्णांचा समावेश आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image