लाल परी येताच गावकऱ्यांनी केली पूजा-अर्चा आणि गोडधोड

As soon as the ST bus arrived, the villagers welcomed it
As soon as the ST bus arrived, the villagers welcomed it
Updated on

अकोले: गेल्या नऊ महिन्यांपासून ती गावाकडे फिरकलीच नाही. ग्रामस्थही वाट पाहून थकले. तेही गावातून बाहेर पडलेच नाही. मात्र, काल शुक्रवारी ती मुक्कामालाच आली. मग काय सारे गाव जमले. तिची पूजाअर्चा केली. श्रीफळ वाढवले.

तिला घेऊन येणाऱ्यांचाह शाल-श्रीफळ आणि गोड जेवण देत आदर सत्कार केला.

कोरोना महामारीमुळे गेली नऊ महिने झाले लाल परी गावात आलीच नाही. मात्र, शुक्रवारी रात्री ती आल्याची बातमी कळताच सारे कूम शेत गाव एकत्र आले.

सरपंच सयाजी अस्वले यांनी व जेष्ठ कार्यकर्त्यांनी तिची पूजा केली. सोबत आलेल्या बसचालक-वाहक यांचा सत्कार केला. दुसऱ्या दिवशी गावातील माणसे तिच्यात बसून राजूरला आली. नऊ महिन्यांनी तिचा सहवास लाभला तसेच जाण्या-येण्याची सोय झाल्याने ग्रामस्थ महिला, शालेय विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले. 

आजारी माणसे ही उपचारासाठी अकोले येथे पोहचले .नव्याने रुजू होणाऱ्या ग्रामसेवक ठाकरे यांनी या लाल परीत येऊनच ग्रामपंचायतीचा चार्ज घेतला. रस्त्याचा प्रस्तावही पाठविला.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com