Maharastra Politics : अजितदादांमुळे अहमदनगर जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलेल

दक्षिणेत पारनेरचे आमदार नीलेश लंके विरुद्ध डॉ. विखे पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष पोहचला शिगेला
maharastra politicals
maharastra politicalssakal

सतीश वैजापूरकर

शिर्डी : उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतेक आमदारांना सोबत घेऊन महायुतीत आले. ही मोठी राजकीय घटना आहे. त्यामुळे राज्याबरोबरच अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणावरदेखील मोठा प्रभाव पडेल. राजकीय समीकरणे बदलतील. दक्षिण नगर जिल्ह्यात त्यांचे सर्वाधिक आमदार आहेत.

त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही मोठी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार केला, तर लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजपला लाभ होईल, असा विश्वास खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

maharastra politicals
Ahmednagar Politics : निवडणूक आयोगाकडून यंत्रांची तपासणी; ६० कर्मचारी तैनात

दक्षिणेत पारनेरचे आमदार नीलेश लंके विरुद्ध डॉ. विखे पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोचला होता. लंकेंकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिणेतील लोकसभेचे उमेदवार म्हणून पाहिले जात होते. उत्तरेत गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गट आणि कोपरगावचे भाजपचे विवेक कोल्हे यांच्या गटात जोरदार संघर्ष झाला.

त्यात विखे पाटलांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला.राष्ट्रवादीत फूट पडली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डॉ. विखे पाटील यांनी ‘सकाळ’ला विशेष मुलाखत दिली.

maharastra politicals
Ahmednagar School News : १६१ शाळांवर टांगती तलवार, पटसंख्येचा प्रश्‍न; शिक्षक भारतीची आक्रमक भूमिका

प्रश्न : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकारणावर काय परिणाम होईल ?

उत्तर : दक्षिणेत खासदार शरद पवार यांच्या तुलनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. जिल्हा बँक, जिल्हा परिषद आदी संस्थांत त्यांची भूमिका आजवर महत्त्वाची राहिली आहे. उत्तरेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रभाव, तर कोपरगावात काळे आणि कोल्हे परिवार या समीकरणामुळे महायुतीत आलेत.

अकोल्यातील समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागांवर भाजपला निश्‍चित लाभ होईल.

गणेश कारखान्याच्या निवडणुकीत आपणास पराभवाला सामोरे जावे लागले. आपण सभासदांची संख्या वाढविली असती तर आपली सत्ता अबाधित राहीली असती, असे आपणास वाटते का ?

maharastra politicals
Ahmednagar News : लांडग्यांच्या छायाचित्रांनी गाजवले रशियाचे प्रदर्शन; नगरचा छायाचित्रकार ओंकार बेद्रेला आंतरराष्ट्रीय बक्षीस

सभासदसंख्या वाढविली असती तर विजय मिळाला असता, ही सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट बाब आहे. सभासदवाढीचा हा फंडा सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत हमखास वापरला जातो. आम्हीदेखील हा फंडा वापरू शकत होतो, मात्र आम्ही ते केले नाही. याचे कारण, प्रतिकूल परिस्थितीत आम्ही ‘गणेश’ चालविला.

यंत्रसामग्री बदलून त्याची गाळपक्षमता वाढविली, हे विरोधकदेखील मान्य करतात. आम्ही केलेल्या कामावर मते मागितली. ऊस न पिकविणाऱ्या सभासदांच्या मतदानामुळे निकाल विरोधात गेला असावा. तरीही, पूर्वीच्या तुलनेत आमच्या मतांत वाढ झाली. हा कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या ताब्यात कधीही आलेला नव्हता, हेही लक्षात घ्यायला हवे.

प्रश्न: सावळीविहीर ते नगर हा राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. निवडणुकांच्या राजकारणातही हा मुद्दा केंद्रस्थानी असतो.

सध्या या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. हे काम करणाऱ्या ठेकेदाराने बँक अनामत रक्कम भरली. येत्या एक ऑगस्टपासून रस्त्याच्या कामासाठी त्याची यंत्रसामग्री येथे येईल. पावसामुळे पुन्हा खड्डे पडले तर ते लगेचच बुजविले जातील. प्रवाशांना त्याचा त्रास होणार नाही, असे मी नक्की सांगू शकतो.

देशातील सर्व विमानतळांची उभारणी व संचालन खासगी कंपन्यांमार्फत केले जाते. शिर्डी विमानतळदेखील खासगी कंपनीकडे सोपवावे, अशी मागणी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नाइट लँडिंग सुविधेचे काम पूर्ण झाले. मात्र, त्यासाठी हवे असलेले कुशल मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे.

- डॉ. सुजय विखे पाटील, खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com