esakal | नाताळापूर्वी नगर जिल्हा परिषद शिक्षकांना देणार गुड न्यूज 
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar Zilla Parishad will give good news to teachers before Christmas

दिवाळीनिमित्त जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना सणअग्रीम दिला जातो.

नाताळापूर्वी नगर जिल्हा परिषद शिक्षकांना देणार गुड न्यूज 

sakal_logo
By
दौलत झावरे

अहमदनगर : दरवर्षीच दिवाळीनिमित्त जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना सणअग्रीम दिला जातो. मात्र यंदाच्या वर्षी शिक्षकांना दिवाळीत पगार व सण अग्रीम मिळालेला नाही. दिवाळीनंतर आठ दिवसांनी शिक्षकांचा पगार खात्यात जमा झालेला आहे. आता शिक्षकांना सण अग्रीम नाताळमध्ये देण्याच्या हालचाली जिल्हा परिषदेत सुरु झालेला आहे. 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सुमारे 12 हजार 500 शिक्षक कार्यरत आहेत. यातील अनेक शिक्षक दिवाळी सणानिमित्ताने सण अग्रीम घेत असतात. मात्र यंदाच्या वर्षी शिक्षकांना सण अग्रीम व पगार दिवाळीत झालेला नाही. निधी तरतूद कमी असल्यामुळे हा प्रकार जिल्हा परिषदेत प्रथमच झालेला आहे. दिवाळी सण झाल्यानंतर आठ दिवसांनी शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा झाल्याने शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. अनेक शिक्षकांची दिवाळीची खरेदी दिवाळीनंतर झालेली आहे. 

दरवर्षीच देण्यात येणाऱ्या सणअग्रीमवरच अनेकांची दिवाळी होत असते. परंतु तो यंदाच्या वर्षी न मिळाल्याने काही शिक्षकांची मोठी अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाने हा सण अग्रीम नाताळमध्ये तसेच आगामी वर्षात जानेवारी देण्याच्या हालचाली सुरु केलेल्या आहेत. सण अग्रीमसाठी शिक्षकांकडून अर्जही मागविण्यात आलेले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून लवकरच शिक्षकांना सण अग्रीम दिला जाणार असल्याचे संकेत यावरून मिळत आहेत. 

सणअग्रीमची कपात 
शिक्षकांना वर्षातून 12500 एकदा सण अग्रीम दिला जातो. या सण अग्रीमची कपात दर महिन्याला शिक्षकाच्या पगारातून केली जात असून प्रत्येक महिला 1250ची कपात केली जाते. ही कपात सलग दहा महिने केली जाते. विशेष म्हणजे हा सण अग्रीम विना व्याजी आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image