esakal | नगर जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीचे घोडे अडले
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar Zilla Parishad's income growth is not discussed

कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या निधीत घट झाली. त्यामुळे विकासकामे ठप्प झाली. वेगाने विकासकामे करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे.

नगर जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीचे घोडे अडले

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर ः कोरोना संकटामुळे जिल्हा परिषदेच्या निधीत कपात झाली. उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्याने अंदाजपत्रक कमी झाले. क्षेत्रफळाने जिल्हा मोठा असतानाही, उत्पन्नाचे स्रोत कमी असल्याचा परिणाम अंदाजपत्रकावर होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी सभापती सुनील गडाख यांनी पुढाकार घेतला होता. तसे नियोजनही केले; मात्र त्यावर कुठलीच हालचाल होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या निधीत घट झाली. त्यामुळे विकासकामे ठप्प झाली. वेगाने विकासकामे करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. ही बाब अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्व पदाधिकारी, सदस्य व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात चर्चा केली.

जिल्ह्यात मोक्‍याच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. त्या जागांवर "बीओटी' तत्त्वावर व्यापारी संकुल उभारणे, मोकळ्या जागा भाडेतत्त्वावर देणे, अतिक्रमण झालेल्यांकडून मासिक भाडेआकारणी करणे आदी उपक्रम हाती घेण्यास जिल्हा परिषद पदाधिकारी व सर्वपक्षीय सदस्यांनी मान्यता दिली.

नुसार जिल्हा परिषदेचे उत्पन्न कसे वाढविले जाईल, यासंदर्भात माहितीचे सादरीकरणही करण्यात आले. मात्र, त्यावर अद्याप कुठलीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढले नाही. हे असेच सुरू राहिले तर आगामी वर्षात जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक 10 कोटींवर येण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीचे आव्हान मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यासमोर असणार आहे. 


जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी पदाधिकारी व सदस्यांची बैठक घेऊन चर्चा केली. उत्पन्न वाढविण्यासाठी नियोजन केले. तसा आराखडा तयार झाला आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी कामकाज केल्यास त्याचा निश्‍चित चांगला परिणाम दिसून येईल. 
- सुनील गडाख, सभापती, अर्थ व पशुसंवर्धन समिती, जिल्हा परिषद 

loading image
go to top