esakal | अकोलेतील अधिकाऱ्यालाच माहिती नाही तालुक्याच्या आमदाराचे नाव
sakal

बोलून बातमी शोधा

The name of the taluka MLA is not known to the officer in Akole

अकोले तालुक्यातील १९० गावासाठी भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी करीता एकच मशीन व कर्मचारीही कमी आहेत.

अकोलेतील अधिकाऱ्यालाच माहिती नाही तालुक्याच्या आमदाराचे नाव

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यातील १९० गावासाठी भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी करीता एकच मशीन व कर्मचारीही कमी आहेत. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे मागणीच केली नाही, असा अकोले येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार माजी आमदार वैभवराव पिचड यांनी उघड केला.

माजी आमदार पिचड यांनी भूमी अभिलेख कार्यालयात भेट देऊन अधिकारी यांचेशी भूमी अभिलेख कार्यालयाच्या अडचणी समजून घेण्यासाठी व जनतेची कामे प्रलंबित असण्या मागची कारणे समजून घेतली. यावेळी मागी आमदार पिचड म्हणाले, तुम्ही अडचणीबाबत काही पत्रव्यवहार केला असेल तर दाखवा. जिल्हाधिकारी यांचेकडे अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करतो. पण तसा कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही, असे दिसून आले आहे. अडचणी वरिष्ठांनाच सांगितले जात नाही, तर प्रश्न कसा सुटणार असा सवाल माजी आमदार पिचड यांनी केला.

भूमी अभिलेख कार्यालयात अनेक कामे प्रलंबित पडली. राजूर येथील आवारी (वय ८५) या दीड महिन्यापासून चकरा मारूनही त्यांना चलन मिळाले नाही, असा या कार्यालयाचा गलथान कारभार सुरु आहे. मोजणी अधिकारी बाहेर मोजणी जाताना त्यांची कोणतीही माहिती नोटीस बोर्डवर लावताना दिसत नाहीत. त्यामुळे जनता भूमी अभिलेख कार्यालयात कामासाठी चकरा मारून वैतागून जाताना दिसतात.

अधिकारी केबिनमध्ये दरवाजा बंद करून बसतात. त्यामुळे जनतेची अनेकवेळा अधिकारी आहे की नाही याबाबत फसगत होते. म्हणून माजी आमदार वैभवराव पिचड यांनी अधिकारी यांना दरवाजा उघडा ठेवून केबिनमध्ये बसा किंवा दरवाजाला काच बसवून घ्या, म्हणजे अधिकारी केबिनमध्ये असल्याचे व काय करीत आहे. हेही जनतेला समजेल अशी विनंती केली. या कार्यालयात वर्ष झाली मोजणीचे पैसे भरून तरी अद्याप काही शेतकऱ्यांची मोजणी झाली नाही. दहा हजार द्या व अर्जंट मोजणी करून घ्या असा सल्ला अधिकारी देतात.

कार्यालयातील अधिकारी वर्ग निवासी राहत नसल्याचे लक्षात आले. बरेच अधिकारी बाहेर गावाहून येताना त्यांना उशीर होतो व परत जाण्याचीही घाई करताना दिसतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी निवासी राहण्याबाबत त्यांना सूचना द्याव्यात, असे पिचड यांनी सांगितले.

माजी आमदार वैभवराव पिचड व भूमिअभीलेख अधिकारी यांची चर्चा सुरु असताना अधिकारी यांना तालुक्याच्या आमदारांचे नाव काय आहे, असे फोनवर विचारले असता त्यांनी इतरांना नाव विचारून समोरच्याला सांगितले. यावरून तालुक्याचे लोकप्रतिनिधी कोण आहे हेच या अधिकाऱ्याला माहीत नसल्याचे स्पष्ट झाले.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image