जुगार खेळणाऱ्या ‘त्या’ शिक्षकांची नावे गुन्ह्यातून वगळली

राजेंद्र सावंत 
Thursday, 20 August 2020

पाथर्डीत पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या पत्याच्या डावावरील छाप्यामुळे तालुका शिक्षण विभागाच्या इभ्रतीला गालबोल लागले आहे.

पाथर्डी (अहमदनगर) : पाथर्डीत पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या पत्याच्या डावावरील छाप्यामुळे तालुका शिक्षण विभागाच्या इभ्रतीला गालबोल लागले आहे. पोलिसांनी छाप्यात सापडलेल्या काहींना वगळल्याने त्यांच्या भुमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. 

अवैध व्यवसायीकाविरुद्ध छापे मारुन कारवाईच्या नावाखाली वरकमाई करण्याचा उद्योग शहरात लाँकडाऊनच्या काळात भरभराटीला आल्याची भावना नागरीक व्यक्त करीत आहेत. तिन दिवसापुर्वी पाथर्डीच्या पोलिस निरीक्षकांच्या हाँटेल प्रशांतच्या अडोशाला (पोलिसांच्या नोंदीनुसार) झुगार खेळताना सात जणांना पकडले. यापैंकी तिनजण पाथर्डीत राहणारे प्राथमिक शिक्षक आहेत. 

शाळेला सुट्या असल्याने व पगारही सुरुच असल्याने शिक्षकांना वेळ कुठे घालवावा हा प्रश्नच आहे. शिक्षकांना पोलिसांना पकडल्यानंतर आम्ही शेती करतो असे सांगितले. एका शिक्षकाने तर नाव खोटे सांगितल्याचे समजते. तालुका शिक्षण विभागाने शिक्षकावर काय कारवाई केली याची माहीती मिळु शकली नाही.

शिक्षकांच्या कृतीला कोणीही पाठीशी घालु नये, अशी मागणी पालकामधुन होते आहे. एक प्राध्यापक येथे होते त्यांना गुन्ह्यातुन वगळण्यात आले. त्यांच्या नोकरीचा प्रश्न असल्याने आम्ही कारवाई केली नाही, अशी मल्लीनाथी पोलिस खाजगीत करीत आहेत. पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी तर मी चौकशी करतो असे सांगितले आहे. पंचायत शिक्षण विभागाची तर यामुळे अब्रु वेशीला टांगली गेल्याची भावना नागरीकामधे आहे. याबाबत एका समाजिक कार्यकत्याने पोलिस अधिक्षकाकडे लेखी तक्रार केली आहे. 

नाव उघड न करण्याच्या अटीवर या प्रकरणाची वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसात न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाण्याची तयारी कार्यकर्त्यांने निवेदनात व्यक्त केली आहे. मी या प्रकरणाची चौकशी करुन कोणाला वगळले का याचा तपास घेतो. तसे काही झाले असेल तर दोषीविरुद्ध कारवाई करतो
- रमेश रत्नपारखी, पोलिस निरीक्षक, पाथर्डी  

पाथर्डीच्या झुगार खेळणाऱ्या दोन शिक्षकांचा अहवाल जिल्हाशिक्षणाधिकारी यांना पाठविला आहे. गुन्ह्याचा प्रथम खबरी अहवाल मिळावा यासाठी पोलिसठाणे व न्यायालयात अर्ज दिला आहे. गुन्ह्याची माहीती घेवुन वरीष्ठांच्या सुचनेनुसार व नियमाप्रमाणे अहवाल तयार करुन पाठविला जाईल.
- अभय वाव्हळ, प्रभारी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पाथर्डी  

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The names of gambling teachers in Pathardi taluka have been dropped