नाना पाटेकर धावले रोहित पवारांच्या मदतीला

नाना पाटेकर-रोहित पवार
नाना पाटेकर-रोहित पवार

जामखेड : नाना पाटेकर यांच्या सामाजिक कामाविषयी संपूर्ण देश जाणून आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही इतर विकासकामांसोबतच जलसंधारणाच्या कामाला महत्त्व दिलंय.

दोन्ही तालुक्यांत पडणाऱ्या पावसाचा थेंब ना थेंब अडविण्यासाठी आमदार रोहित पवारांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प साकारण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांची त्यांनी मदत घेतली. तसेच, मदत करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त करण्याचा अनोखा फंडा हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात नाना पाटेकर यांची भेट घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करीत, सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले.

कोणत्याही कामासाठी मदत मागणारे अनेक हात असतात; मात्र प्रत्यक्ष मदत मिळाली आणि काम साकारल्यानंतर मदत करणाऱ्यांना भेटून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे मोजकेच असतात. हेच काम आमदार रोहित पवार यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. (Nana Patekar's help to Rohit Pawar in water conservation work)

नाना पाटेकर-रोहित पवार
महाबीज कर्जत-जामखेडमध्ये घेणार उडदाचे बीजोत्पादन

आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने कर्जत-जामखेड तालुक्यांत जलसंधारणाची कोट्यवधी रुपये अंदाजपत्रकीय खर्च असणारी कामे लोकसहभाग व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मोठ्या खुबीने सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने भारतीय जैन संघटना (बीजीएस), सकाळ रिलीफ फंड, बारामती ॲग्रो, नाम फाउंडेशन, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांसह इतर विविध संस्थांची मदत निरनिराळ्या कामांसाठी त्यांनी आजतागायत घेतली आहे.

यामध्ये सर्व ठिकाणी ‘नाम फाउंडेशन’ ही संस्था जलसंधारणाच्या कामात सर्वसाधारणपणे अग्रेसर आहे. या संस्थेची कामे राज्यभर सुरू आहेत. कर्जत-जामखेड या दोन्ही तालुक्यांमध्ये जलसंधारणाच्या कामांना त्यांची मोठी मदत मिळाली आहे. त्यामुळे या संस्थेचे सर्वेसर्वा सिनेअभिनेते नाना पाटेकर यांची आमदार रोहित पवारांनी समक्ष भेट घेतली. नाम फाउंडेशनच्या पुढाकाराने राज्यभर सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले. कर्जत-जामखेडमध्ये होत असलेल्या कामांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

नानांच्या कामांमुळे प्रेरणा!

कर्जत-जामखेड हे दोन्ही तालुके अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणारे तालुके. पाटपाण्याची बारमाही सुविधा नसल्याने (काही भाग सोडून) हंगामी शेतीवरच आधारभूत असलेले हे तालुके पाण्याच्या बाबतीत सक्षम व्हावेत, याकरिता जलसंधारणाच्या कामांना आमदार रोहित पवारांनी प्राधान्य दिले आहे. स्वयंसेवी संस्थांसह लोकसहभागातून तीस गावांमध्ये सध्या कामे सुरू आहेत. नानांच्या कामातून प्रेरणा घेऊन जलसंधारणाची कामे सुरू केल्याचेही पवार यांनी सांगितले. (Nana Patekar's help to Rohit Pawar in water conservation work)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com