
-सतीश वैजापूरकर
शिर्डी : काश्मीर खोऱ्यात मागील वर्षी दीड कोटी पर्यटकांनी भेट दिली. काश्मीरच्या इतिहासातील हा एक विक्रम आहे. त्यात महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या सर्वाधिक होती. येत्या २६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेली वंदेभारत ट्रेन खोऱ्याच्या दृष्टीने गेमचेंजर ठरेल. पर्यटकांचे प्रवासभाडे कमी होईल आणि वाहतुकीचा खर्च कमी होणार असल्याने खोऱ्यात स्वस्ताई होईल. पर्यटकांच्या संख्येत फार मोठी वाढ होईल. खोऱ्यात उत्साहाचे वातावरण असून, काश्मीरी जनता पर्यटकांच्या स्वागतात मग्न आहे. काही वर्षांपूर्वी भरकटलेले युवक आता पर्यटन व्यवसायावर लक्ष केंद्रित करीत आहेत, अशी माहिती काश्मीर खोऱ्यातील पर्यटन क्षेत्रातील जाणकार एजाज शाह यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.