नवरात्रौत्सवात राशीनच्या देवीची परंपरा मोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

NCP is aggressive in breaking the tradition of Goddess Rashin
NCP is aggressive in breaking the tradition of Goddess Rashin

राशीन : विजयादशमीला यमाईदेवीस फूल लावून कौल न मागितल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे. किमान आता कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी देवीला कौल लावावा, या मागणीसाठी आज मंदिरासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी आराधी गीते गात या प्रकाराचा निषेध केला. 

राष्ट्रवादीचे युवक नेते शहाजी राजेभोसले, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सुभाष जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलनात भाग घेतला. दरम्यान, याच मागणीसाठी आज राशीनमध्ये कडकडीत "बंद' पाळण्यात आला. चंद्रकांत जगताप, रजनी निंभोरे यांच्यासह आराधी मंडळींनी देवीची गाणी म्हणत रस्त्यावर ठिय्या दिला. 

राजेभोसले म्हणाले, ""देवीला फूल लावण्याची परंपरा यंदा खंडित झाल्याने भाविकांच्या भावनेला धक्का बसला आहे. प्रशासनाने भाविकांच्या भावनांचा आदर राखून योग्य निर्णय घ्यावा.'' 

जाधव म्हणाले, की देवीस कौल न लावल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बंदोबस्त दिला होता. पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलकांनी "बंद' मागे घेतल्याचे सांगूनही बहुतांश व्यावसायिकांनी दुकाने दिवसभर बंद ठेवली. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com