शेवगावमध्ये दिव्यांगांना कपडे, फराळाचे वाटप

सचिन सातपुते
Friday, 20 November 2020

सावली दिव्यांग संस्था व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिव्यांग सेलतर्फे दिवाळीनिमित्त तालुक्‍यातील दिव्यांग बांधवांना कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले.

शेवगाव (अहमदनगर) : सावली दिव्यांग संस्था व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिव्यांग सेलतर्फे दिवाळीनिमित्त तालुक्‍यातील दिव्यांग बांधवांना कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्‍यातील दिव्यांगांना मदतीचा एक हात म्हणून हा उपक्रम झाला. 

कोरोना संसर्गामुळे सर्वसामान्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. दिव्यांग बांधवांचीही अवस्था अत्यंत दयनीय आहे. सणासुदीच्या काळात प्रत्येक जण फराळ व कपड्यांची खरेदी करून उत्सव गोड करण्यात मश्‍गूल होता. मात्र, राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे अध्यक्ष गणेश हणवते व सावली दिव्यांग संस्थेचे राज्य उपाध्यक्ष चॉंद शेख यांनी दिव्यांगांना कपडे व फराळवाटपाचे नियोजन केले. त्यानुसार तालुक्‍यातील व शहरातील दिव्यांगांना फराळवाटप केले. 

महेश उगले, दिव्यांग संस्थेचे तालुका उपाध्यक्ष संभाजी गुठे, सचिव नवनाथ औटी, कार्याध्यक्ष मनोहर मराठे, संघटक खलिल शेख, शहराध्यक्ष गणेश महाजन, सनिल वाळके, अशोक कुसळकर, गणेश तमानके, विठ्ठल घवले, प्रदीप निकाळजे, सिद्धांत बटुळे उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले व पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP distributes Diwali clothes to the disabled in Shevgaon