राष्ट्रवादीत प्रवेशाचा ट्रेंड सुरू! राहुरीत भाजपला झटका

ncp
ncpesakal

राहुरी (जि.अहमदनगर) : राहुरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले (mla shivaji kardile) यांचे कट्टर समर्थक नगरसेवक शहाजी जाधव (ठाकूर) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये (ncp) प्रवेश केला. त्यापाठोपाठ राहुरी मतदारसंघातील धनगरवाडीचे (ता. नगर) सरपंच किशोर शिकारे यांनी चार ग्रामपंचायत सदस्यांसह भाजपाला सोडचिठ्ठी देऊन, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (prajakt tanpure) यांनी कर्डिलेंना दिलेला धक्का मानला जात आहे. आज (ता.25) नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा झाला.

राष्ट्रवादीत प्रवेशाचा ट्रेंड सुरू

नगरसेवक जाधव (ठाकूर) म्हणाले, "मंत्री तनपुरे नगराध्यक्ष असताना विरोधी नगरसेवक म्हणून प्रभागात विकास कामांमध्ये कधीही दुजाभाव केला नाही. यापुढेही राष्ट्रवादीचे एकनिष्ठ काम करून, पक्षाची व मंत्री तनपुरे यांची ताकद वाढविण्यास मदत करू." जिल्हाध्यक्ष फाळके म्हणाले, "राहुरी पालिकेच्या आगामी निवडणुकीत विरोधकांना शून्यावर बाद करण्याचा मंत्री तनपुरे यांचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीकडे तरुण आकर्षित होत आहेत. कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीत प्रवेशाचा ट्रेंड सुरू झाला आहे."

विकासाचे राजकारण करुन, आघाडीवर राहू."

मंत्री तनपुरे म्हणाले, "नगरसेवक जाधव (ठाकूर) तळागाळातील जनतेच्या समस्या समजून घेऊन काम करणारे नेतृत्व आहे. त्यांच्या प्रभागात जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून, त्यांना राष्ट्रवादीत योग्य सन्मान मिळेल. नगर तालुक्यात ऊर्जा विषयक समस्या दूर करण्यासाठी नियोजनबद्ध काम चालविले आहे. नगर तालुक्यात विकासाचे राजकारण करुन, आघाडीवर राहू."जिल्हा सरचिटणीस सुनील आडसुरे, राहुरीचे नगराध्यक्ष अनिल कासार, रोहिदास कर्डिले, प्रकाश भुजाडी, बाळासाहेब उंडे, दशरथ पोपळघट, संजय साळवे, राष्ट्रवादी कला, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. श्याम शिंदे उपस्थित होते.

ncp
कृषी विद्यापीठाची कमान नव्या अधिकाऱ्यांवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com