शरद पवार म्हणाले... ‘तुम्ही’ काळजी करु नका, मी तुमच्या पाठीशी

सनी सोनावळे
Friday, 14 August 2020

के. के. रेंज जमीन अधिग्रहणबाबत केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची आपण भेट घेऊन तेथील वस्तुस्थिती निदर्शनास आणून देऊ, या विषयात कोणीही राजकारण करू नये.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : के. के. रेंज जमीन अधिग्रहणबाबत केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची आपण भेट घेऊन तेथील वस्तुस्थिती निदर्शनास आणून देऊ, या विषयात कोणीही राजकारण करू नये. तेथील एक इंचही जमिन आपण जाऊ देणार नाही. शेतकऱ्यांनो काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहोत, असे आश्वासन जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार निलेश लंके यांना दिले आहे.
मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शुक्रवारी (ता. १४) आमदार लंके यांनी पवार यांची के. के. के. रेंज विषयी भेट घेऊन याबाबत आपण लक्ष घालावे. फारपुर्वी या जमिनी जिरायात होत्या. आता मात्र शेतकऱ्यांनी त्या बागायती केल्या आहेत. त्यावर अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाह आहेत. आमच्या शेतकऱ्यांनी कष्टाने तयार केलेल्या जमिनी वाचाव्यात, अशी विनंती केली. याबाबत पवार म्हणाले, राजनाथ सिंग यांची के. के. रेंज बाबतीत आपण फेब्रुवारीमध्येच वेळ मागितली होती. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर ती होऊ शकली नाही. लवकरच आपण त्यांची भेट घेऊन तेथील वस्तुस्थिती मांडू. शेतकऱ्यांची जमिन अधिग्रहण न करणे बाबत ठामपणे आपली बाजु मांडु यामध्ये कोणीही राजकारण करू नका. सर्वांना बरोबर घेऊन पोक्तपणाने हा विषय हाताळणे गरजेचे आहे.

आमदार लंके म्हणाले, के. के. रेंजबाबत आपण पवार यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे. याकरीता योग्य त्या कागदपत्रासहींत आपण पाठपुरावा करत आहोत. फेब्रुवारी महिन्यातच सिंग यांची भेटची वेळही ठरली होती. मात्र कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर ती होऊ शकली नाही. लवकरच ती होईल व यातुन सकारात्मक मार्ग निश्चित निघेल. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, सरपंच राहुल झावरे व गणेश हाके उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Lanka met Sharad Pawar regarding KK Range land acquisition