पिचड यांना सगळे दिले तरी गेले मग पडले; पवारांची कोपरखळी

NCP national president MP Sharad Pawar has said that Bhangre socialization is an important factor in politics.jpg
NCP national president MP Sharad Pawar has said that Bhangre socialization is an important factor in politics.jpg

अकोले (अहमदनगर ) : महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारणातील जे महत्वाच्या व्यक्ती व घटक होते, त्यापैकी कै. यशवंतराव भांगरे हे आहेत. त्यांच्यासोबत काही काळ काम करता आले. तालुका डाव्या चळवळीचा असतानाही भांगरे यांनी तालुक्यात पायाभूत सुविधा दिल्या. यापुढेही त्यांनी सुरु केलेल्या कामास आमची साथ राहील. तालुक्यातील पर्यटन, रस्ते व अगस्तीचा प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करू, असे उद्गार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी भंडारदरा (शेंडी) येथे बोलताना काढले. 

मा.आमदार कै. यशवंतराव भांगरे यांच्या ३९ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे उदघाटन झाले. त्यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालक मंत्री हसन मुश्रीफ होते. तर प्रमुख उपस्थितीत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, राजेंद्र फाळके, संदीप वरपे, उत्कर्ष रुपवते, आमदार माणिक कोकाटे, डॉ. किरण लहामटे, माजी आमदार गोटीराम पवार, दशरथ सावंत, मधुकर नवले,  रमेश खांडगे, अरुण कडू, रावसाहेब म्हस्के, मीननाथ पांडे, सुनीता भांगरे, भानुदास तिकांडे, दादा वाकचौरे उपस्थित होते. स्वागत करताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक भांगरे यांनी माजी आमदार यशवंतराव भांगरे व पवार कुटुंबियांचे कौटुंबिक संबंध असून ते यानिमित्त पुनः पुनर्जीवित झाले आहे. 

तालुक्याचा पर्यटन तालुका म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी रस्ते विकास, उपसासिंचन योजनेसाठी निधी मिळावा तर आमदार डॉ. किरण लहामटे यांनी तालुक्यात देवीचा घाट, टोलारखिंड, औद्योगिक वसाहतीसाठी मंजुरी मिळून कामे सुरु झाल्यास रोजगाराचा प्रश्न सुटेल. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी १९६२ साली विधानसभेत यशवंतराव भांगरे यांनी प्रवेश केला. त्यावेळी मंत्रिपद देत असतानाही ते नाकारून माझ्या तालुक्याचा विकास करा, ही मागणी लावून धरली.  तेच काम त्याचे कुटुंबीय करत आहे. तालुक्याचा विकासासाठी, रस्त्यांसाठी निधीबाबत बोलताना कोरोनामुळे आर्थिक कामांना मर्यादा आल्या. त्याचा परिणाम विकास कामावर झाला, मात्र तुम्ही मुंबईला या तुमच्या सर्व समस्या दूर करू. पर्यटन तालुका होण्यासाठी मी पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री म्हणून पाठपुरावा कारेन, असे आश्वासन दिले. 

यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, पहिल्यांदा लोणीला इयत्ता नववीत असताना सायकलवर जाताना रंधा फॉल तेव्हापासून हा भाग माझ्या स्मरणात आहे. या भागासाठी काही तरी करणे आवश्यक आहे. जे लोकप्रतिनिधी निवडून येतात ,त्यांनी तालुक्याला सुविधा देताना तालुक्यातील जनतेला दुर्लक्षित करता कामा नये. पवनचक्कीसाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या. त्या जमीन मालकांची मुले नोकरीला घेतली का? त्यांना लाभ मिळाला का? याचा अभ्यास करून माझ्याकडे या, आपण संबंधित मालकाला जाब विचारू.

तालुक्यात विकास झाला नाही हे ऐकून मला खाली मान घालावी लागत आहे, अगस्ती ३५ कोटींवर ३०० कोटी कर्ज असल्याचे सांगण्यात आले. मी वसंतदादा शुगरचा अध्यक्ष आहे. यातून मार्ग काढण्यासाठी अल्कोहोल निर्मिती, वीज निर्मिती, सीएनजी निर्मिती करून समस्या दूर करू. परंतु झारीतील शुक्राचार्य कोण? हे ओळखून त्यांना बाजूला करा असेही ते म्हणाले. तालुक्याच्या रस्ते, पर्यटन विकासाबाबत तुम्हाला पालकमंत्री यांनी माझ्यासमक्ष आश्वासन दिले, त्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी त्यांना अडचण आल्यास आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलू असेही पवार म्हणाले.  

निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदाराचे नाव नसल्याचे कळले. त्यामुळे यापुढे विकासकामासाठी व  कामासाठी, निवडणुकीसाठी एकत्र व समनव्याने काम होणे आवश्यक आहे. असा चिमटा त्यांनी भांगरे यांना घेतला. १९८० साली आपण ५६ आमदाराचा विरोधीपक्ष नेता म्हणून काम करत होतो. कामासाठी इंग्लडला गेलो असताना ५० आमदार फुटले. सहा आमदार शिल्लक मात्र मी स्थिर राहिलो. ५० पैकी ४८ आमदार पराभूत झाले. तर पिचड यांना मंत्री, पक्षाचे अध्यक्ष, विरोधीपक्ष नेता केले. मात्र ते मला सोडून गेले व पराभूत झाले. मला पहिल्या परिवर्तन सभेतच लोकांच्या मनात काय चालले ते समजले होते. पालकमंत्री माझ्यासमोर दिलेला शब्द पाळा, ग्रामीण विकास खात्याकडे मंजुरीचे अधिकार आहेत ते वापरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com