शरद पवार, अजित पवारांमुळे राष्ट्रवादीला चांगले दिवस 

गौरव साळुंके
Saturday, 17 October 2020

राष्ट्रवादीला चांगले दिवस आले आहेत. जेष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची बांधणी करताना सर्व घटकांचा समावेश करुन घेतल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

श्रीरामपूर (अहमदनगर) : राष्ट्रवादीला चांगले दिवस आले आहेत. जेष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची बांधणी करताना सर्व घटकांचा समावेश करुन घेतल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. येथील रामराव आदिक सभागृहात राष्ट्रवादीच्या नव र्निवाचित सदस्यांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. 

नगराध्यक्षा अनुराधा आदिक, कपील पवार, गजेद्र भांडवलकर, शहराध्यक्ष लकी सेठी, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, महिलाध्यक्षा अर्चना पानसरे, मल्लु शिंदे उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी नुकतीच पक्षामध्ये फेरबद्दल केले. असुन सोहेल शेख (दारुवाला) यांची अल्पसंख्याक प्रदेश सचिवपदी तर वडाळा येथील सचिन पवार यांची युवक तालुकाध्यक्षपदी तर हर्षल दांगट यांची विद्यार्थी तालुकाध्यक्षपदी निवड केली. निवडीबद्दल पक्षाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी आमदार जगताप म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे नगर जिल्हयाकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे निवडी झालेल्या पदाधिकार्यंनी चांगले काम करुन पक्षाला बळकटी द्यावी. स्व. खासदार गोविंदराव आदिक यांनीही पक्ष वाढीसाठी मोलाचे कार्य केले आहेत. पक्षाने अविनाश अदिक यांना मोठी जबाबदारी दिली आहे. प्रदेश सरचिटणीस पदासह पक्षाचे प्रवक्ते म्हणुन ते कार्यरत आहे. तसेच नांदेड जिल्ह्याचे प्रभारीपद त्यांच्याकडे सोपविले आहेत.

यावेळी नगराध्यक्षा आदिक यांनी नवर्निवाचित पदाधिकार्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. प्रारंभी लकी सेठी यांनी प्रास्तविक केले. तर कैलास बोर्डे यांनी आभार मानले. याप्रसंगी नगरसेवक रईस जहागिरदार, राजेंद्र पवार, अलतमेश पटेल, गुरुचरण भटियाणी, योगेश जाधव, निरंजन भोसले. अ‍ॅड. राजेश बोर्डे यांचा सत्कार करण्यात आला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP workers felicitated at Sangram Jagtap in Shrirampur