esakal | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

NCP's Akole taluka executive announced

राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक दिवसांपासुन कार्यकारणी जाहीर करणे प्रलंबित होती. अकोले तालुक्यातील विविध विभागातील मुळा, प्रवरा,आढळा,राजुर विभागातील कार्यकर्ते यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जबाबदारी टाकली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अकोले तालुका कार्यकारिणी जाहीर

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारणी आमदार डाॅ.किरण लहामटे यांच्या उपस्थित जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचीत पदाधिकारी यांना नियुक्तीपञ व सत्कार यावेळी करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक दिवसांपासुन कार्यकारणी जाहीर करणे प्रलंबित होती. अकोले तालुक्यातील विविध विभागातील मुळा, प्रवरा,आढळा,राजुर विभागातील कार्यकर्ते यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जबाबदारी टाकली आहे.

यावेळी आमदार डाॅ.किरण लहामटे यांनी नुतन पदाधिकारी यांना शुभेच्छा देताना म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब,उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धेय्य, धोरणे व विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम पदाधिकारी यांना करावयाचे आहे.

सर्वच कार्यकर्ते हे तोलामोलाचे स्पर्धेत असल्याने पदांच्या बाबत न्याय देताना विचारपूर्वक न्याय द्यावा लागला यामुळे बराच कालावधी गेला.तसेच अकोले तालुक्यातील विभागवार कामे,समस्या यांचा अभ्यास करुन अकोले तालुक्यातील जनतेला न्याय देण्याची भुमिका पदाधिकारी व पक्ष कार्यकर्ते यांनी घ्यावी.

हेही वाचा - श्रीगोंदे बाजार समितीत दुफळी


पक्षात काही युवा कार्यकर्ते, जेष्ठ कार्यकर्ते यांनी पदे मिळाली नाहीत म्हणुन नाराज होऊ नये.भविष्यात  त्या योग्य ठिकाणी संधी देण्यात येणार आहे.असे ते म्हणाले.
यावेळी खालील पदे जाहीर करण्यात आली आहेत.

अध्यक्ष भानुदास तिकांडे,कार्याध्यक्ष राजेंद्र भीमाशंकर कुमकर, कार्याध्यक्ष सोपानराव शंकर शेळके,सरचिटणीस विकास आत्माराम बंगाळ, खजिनदार चंद्रभान महादु नवले,चिटणीस तुकाराम भोरु गभाले,तान्हाजी देशमुख, देवराम काळे,सुरेश रावते,शरद कोंडार,,संजय बिन्नर, दयानंद वैद्य ,पक्ष प्रवक्ते विनोद हांडे, समशेरपुर विभाग उपाध्यक्ष कोंडाजी ढोन्नर, देवठाण विभाग रामदास उगले,कोतुळ विभाग हेमंत देशमुख, सातेवाडी विभाग ज्ञानदेव मुठे, धा.आवारी विभाग बाळासाहेब आवारी,बोटा विभाग, संतोष शेळके, राजुर विभाग धिरज संगभोर, कार्यकारणी सदस्य दिलिप भांगरे,मारुती हिले, रामनाथ सहाणे,मंजुळा ढोकरे,कुसा मधे,मंगळा पटेकर, देवराम हाळकुंडे,शिवाजी नाईकवाडी, भागवत कुमकर, निवृत्ती बेणके,सखाराम गांगड,

युवक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी खालीलप्रमाणे अध्यक्ष रविंद्र मालुंजकर, अध्यक्ष युवती राष्ट्रवादी विजया पाडेकर-ठोंबाडे,अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थ्यां तनुजा घोलप,अध्यक्ष राष्ट्रवादी अल्पसंख्याक अन्सार याकुब तांबोळी,अध्यक्ष सामाजिक न्याय,विभाग भाविक खरात, अध्यक्ष डाॅक्टर सेल डाॅ.सतिश चासकर,अध्यक्ष लिगल सेल अॅड.अमोल लांडे,अध्यक्ष सहकार तुकाराम गोर्डे, अध्यक्ष कामगार भगवान लोहरे, अध्यक्ष दिव्यांग अमर मुरुमकर, अध्यक्ष दिव्यांग महिला सुंदर उगले,अध्यक्ष वक्ता संतोष वागळे.

अध्यक्ष प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब साळवे,तालुका संघटक सुभाष मालुंजकर, बाळासाहेब भालके आदी पदाधिकारी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

संपादन - अशोक निंबाळकर