रोग प्रतिकारकशक्ती टिकविण्यासाठी सकस आहाराची गरज

सचिन सातपुते
Sunday, 20 September 2020

सध्याच्या काळात रोग प्रतिकारक शक्ती टिकविण्यासाठी सकस आहाराची गरज आहे. शारिरीक व मानसिक स्वास्थ व्यवस्थिस असल्यास आपण कुठल्याही आजारावर मात करु शकतो. असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री चंद्रशेखर घुले यांनी केले. 

शेवगाव (अहमदनगर) : सध्याच्या काळात रोग प्रतिकारक शक्ती टिकविण्यासाठी सकस आहाराची गरज आहे. शारिरीक व मानसिक स्वास्थ व्यवस्थिस असल्यास आपण कुठल्याही आजारावर मात करु शकतो. असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री चंद्रशेखर घुले यांनी केले. 

दहिगावने (ता. शेवगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित राष्ट्रीय पोषण अभियान 2020 कार्यक्रमात घुले बोलत होत्या. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस. एस. कौशिक, इफको प्रमुख व्यवस्थापक डी. बी. देसाई, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी सोपान ढाकणे, वैदयकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे, सरपंच सुभाष पवार, उपसरपंच राजाभाऊ पाउलबुद्धे आदी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले होते.

क्षितीज घुले म्हणाले की, आहारामध्ये विविध घटकांचा समावेश व्हावा. यासाठी घराशेजारीच परसबागेची निर्मिती केल्यास रसायनमुक्त व नैसर्गिक आहार आपल्याला उपलब्ध होईल. ग्रामीण भागातील सर्वांनाच जागा आणि पाणी उपलब्ध असल्याने हे सहज शक्य आहे.

दैनंदिन जीवनातील आहारामध्ये जैव संपृक्त पिकाचे महत्व व पोषण थाळी या विषयावर गृह विज्ञान विषय विशेषज्ञ डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी ऑनलाईन पद्धतीने सादरीकरण केले. यावेळी महिलांना पोषण परसबागेसाठी भाजीपाला बियाणे कीट, गांडूळखत व शेवगा रोपे आदींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी खामगावचे सरपंच केदार आगळे, रांजणीच्या सरपंच मनीषा घुले व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बडधे यांनी केले. तर राहुल पाटील यांनी आभार मानले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The need for a healthy diet to maintain immunity