नेहरू मार्केट, प्रोफेसर कॉलनी चौकात महापालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणार

Nehru Market, Municipal Colony will set up a shopping complex at Professor Colony Chowk
Nehru Market, Municipal Colony will set up a shopping complex at Professor Colony Chowk
Updated on

नगर ः_ महापालिकेच्या उत्पन्नवाढीसह शहराच्या वैभवात भर पडण्यासाठी नेहरू मार्केट, प्रोफेसर कॉलनी चौक व सावेडी एनसीसी कार्यालयाच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्‍स बांधण्यात येणार आहे. त्यासाठी नगररचना विभाग व बांधकाम विभागांना प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली आहे.

बांधकाम परवान्यासाठी नागरिकांना तत्काळ परवानगी द्यावी, फायलींचा प्रवास कमीत कमी दिवसांत करून मंजूरी देण्याचा आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिला. 

महापालिकेतील नगररचना विभाग, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, अमृत पाणीयोजना, फेज-2 पाणीयोजनेच्या विभागाच्या बैठकीत वाकळे यांनी सूचना केल्या. उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे, संजय ढोणे, निखील वारे, सतीश शिंदे, नगररचना विभागप्रमुख राम चारठाणकर, शहर अभियंता सुरेश इथापे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख रोहिदास सातपुते आदी उपस्थित होते. 

वाकळे म्हणाले, की प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी अमृत पाणीयोजनेच्या पाइपलाइन टाकण्याच्या कामास गती दिली आहे. अनेक अडथळे दूर झाले असून, लवकरच शहराला पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे. शासनाच्या विविध योजनांची कामे शहरात सुरू असून, लवकरच ती कामे मार्गी लागावीत, यासाठी प्रशासनाने काम करावे. 

गंगा उद्यानाशेजारील रस्ता हा औरंगाबाद रस्त्याला जोडणार आहे. रस्त्याचे काम 90 टक्‍के पूर्ण झाले असून, काही तांत्रिक अडचणीमुळे काम रखडले आहे. प्रशासनाने तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण करावे.

तारकपूर रस्ता ते विभागीय एसटी डेपोला जोडणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्त्याचे काम मार्गी लावावे, असे महापौर वाकळे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com