बालविवाह भोवला! नेवासे पोलिसांत मुलीच्या आई- वडिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा

सुनील गर्जे
Wednesday, 16 December 2020

सलाबतपूर येथील एका अल्पवयीन मुलीचा बळजबरीने बालविवाह लावून दिल्याबद्दल खाजगी चाईल्ड लाईनच्या फिर्यादीवरून नेवासे पोलिसांत मुलीच्या आई-वडिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासे (अहमदनगर) : तालुक्यातील सलाबतपूर येथील एका अल्पवयीन मुलीचा बळजबरीने बालविवाह लावून दिल्याबद्दल खाजगी चाईल्ड लाईनच्या फिर्यादीवरून नेवासे पोलिसांत मुलीच्या आई-वडिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर येथील चाईल्ड लाईनचे कर्मचारी प्रवीण शाम कदम (वय २७, रा. एकनाथनगर, केडगाव ता. नगर) यांनी नेवासे पोलिसांत याबाबत तक्रार दिली. यात त्यांनी २ डिसेंबरला अज्ञात व्यक्तीने चाईल्ड लाईनच्या हेल्पलाईन नंबरवर फोन करून सलाबतपूर येथील एका १६ वर्षे मुलीचा विवाह लावून देण्यात आला आहे.  अशी माहिती दिली होती. त्यानंतर फिर्यादीसह चाईल्ड लाईनच्या सदस्यांनी  याबाबत सखोल माहिती घेतली. या मुलीचे आठरा वर्षे पूर्ण होण्याआधीच तिचे आई व वडील यांनी तिचा बालविवाह दिनेश गंगाधर तेलुरे (रा.शेवगाव) याच्याशी लावून दिला. 

नवरा मुलगा त्याचे वडील गंगाधर वामन तेलुरे व आई तारामती गंगाधर तेलुरे यांना मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतांना देखील हा बालविवाह लावन्याय आल्याचे उघड झाले.

दरम्यान फिर्यादीने सलाबतपूर येथील ग्रामसेवक भाऊसाहेब शेळके यांना वेळोवेळी समक्ष भेटून  सदर अल्पवयीन मुलीचे जन्म दाखला, आधार कार्ड असे कागदपत्राचे पुरावे गोळा करून व पूर्ण चौकशी केली असता या मुलीचे वय १६ वर्षे सोळा दिवस असे आढळले. यावरून नेवासे पोलिसांत वरील पाचजनांविरोधात  बालविवाह प्रतींबधक अधिनियमा नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nevasa police have registered a case against five persons including the girl parents