Ashadhi Wari : 'माउलींच्या जयघोषाने नेवासेनगरी दुमदुमली'; ज्ञानोबाच्या जयघोषात दिंडी सोहळ्यातील पहिले रिंगण

दिंडी प्रस्थानापूर्वी श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज व पैठण येथील संत एकनाथ महाराजांचे वंशज पैठण मेघश्याम गोसावी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात माउलींच्या पादुकांचे अभिषेक घालून पूजन करण्यात आले.
Devotional Energy Peaks in Nevasa During the First Ringan of the Dindi
Devotional Energy Peaks in Nevasa During the First Ringan of the DindiSakal
Updated on

नेवासे शहर : संतश्रेष्ठ महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासे येथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी दिंडीने टाळ मृदंगाच्या गजरात व ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा जयघोष करत पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी ‘माउली माउली’च्या गजराने नेवासेनगरी दुमदुमली होती. नेवासे येथून  माउलींच्या निघालेल्या या पालखी दिंडी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी भाविक सहभागी झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com