Ahilyanagar News: नेवाशाच्या विकासासाठी ५९.४० कोटींची मंजुरी; विठ्ठल लंघे यांच्या पाठपुराव्याला यश ; कुंभमेळ्यामुळे रस्त्यांचे भाग्य उजळले

Nevasa Road Development : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नेवासे तालुक्यातील चार महत्त्वपूर्ण रस्ते विकासकामांना ५९ कोटी ४० लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. रस्त्यांचे मजबुतीकरण, रुंदीकरण आणि लहान पुलांच्या बांधकामामुळे भाविकांसह स्थानिक नागरिकांच्या वाहतुकीला सुविधा मिळणार आहे.
Road development projects worth Rs 59.40 crore approved in Nevasa ahead of Kumbh Mela 2027.

Road development projects worth Rs 59.40 crore approved in Nevasa ahead of Kumbh Mela 2027.

esakal

Updated on: 

नेवासे शहर: आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नेवासे तालुक्यातील रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाने चार महत्त्वपूर्ण विकासकामांना एकूण ५९ कोटी ४० लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली आहे. आमदार विठ्ठल लंघे यांनी या कामांसाठी शासनस्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि पाठपुराव्याला यश आले आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील रस्ते वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे.

Loading content, please wait...