नेवासे विलगीकरण कक्षातील व्यक्तींना देण्यात आले प्राणायमाचे धडे... 

nagar.
nagar.
Updated on

नेवासे (नगर) : नेवासे फाटा येथील विलगीकरण कक्षातील कोरोनाबाधित रुग्ण व विलगीकरण केलेल्या व्यक्ती या उत्साही व तणावमुक्त राहण्यासाठी तहसीलदार रुपेश सुराणा यांनी विलगीकरण कक्ष आवारात योग व प्रणायमाचे धडे सुरू केले असून त्याला उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

नेवासे फाटा असलेल्या शासकीय वसतिगृह येथे असलेल्या विलगीकरण कक्षात असलेल्या कोरोना बाधित व विलगीकरण केलेल्या व्यक्तींसाठी दररोज सकाळी आवारात तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या संकल्पनेतून योग-प्राणायनाचे धडे सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून दिले जातात. यासाठी  योग, प्राणायाम प्रशिक्षणात डॉ. प्रणव जोशी, डॉ.अविनाश काळे हे मदत करत आहे. या प्राणायम प्रशिक्षणात भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, राहुल चव्हाण, अतुल कु-हाडे यांच्यासह विलगीकरण कक्षातील कर्मचारीही सहभागी नोंदवत आहेत. 

नेवासेंचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा म्हणाले, विलगीकरण कक्षात एकूण अठरा व्यक्ती असून त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी, ते तणावमुक्त राहावे या उद्देशाने येथे हे योग, प्राणायामाचे प्रशिक्षण सुरू केले आहे. त्यामुळे विलगीकरण कक्षातील व्यक्ती तणावमुक्त व उत्साह आहे.

संपादन- सुस्मिता वडतिले 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Karjat Sets an Example of Humanity as Volunteers Stand by Their Sick Companion
Parents Trust the School, Infrastructure Fails the Students in Akole
Compassion in Action: Hingani Dumala Villagers Support Family After Tragic Loss
Anna Hazare’s Protest Averted as Maharashtra Govt Stays New RTI Rules
Marathi News Esakal
www.esakal.com