esakal | मनोज पाटील नगरचे नवे पोलिस अधीक्षक
sakal

बोलून बातमी शोधा

New Superintendent of Police of Manoj Patil Nagar

अखिलेशकुमारसिंह यांनी २ एप्रिल रोजी नगरचा पदभार घेतला होता. त्यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यात चांगले काम होईल, अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली.

मनोज पाटील नगरचे नवे पोलिस अधीक्षक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नगर ः नगरचे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची सहाच महिन्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर सोलापूर ग्रामीणचे मनोज पाटील यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

अखिलेशकुमारसिंह यांनी २ एप्रिल रोजी नगरचा पदभार घेतला होता. त्यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यात चांगले काम होईल, अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली. नगरच्या बहुतांशी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही त्यांच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा होती. गेल्या महिनाभरापासून त्यांच्या बदलीचे घाटत होते.

अखिलेशकुमार सिंह यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय असल्याने त्यांच्याविरोधातील तक्रारींची दखल घेतली जात नव्हती. मात्र, आज त्यांच्या बदलीचा आदेश निघाला. ते सर्वात कमी कालावधीत बदली झालेले पोलिस अधीक्षक आहेत. यापूर्वी लखमी गौतम यांची अवघ्या नऊ महिन्यात बदली झाली होती.

संपादन - अशोक निंबाळकर