
श्रीगोंदे : घोड धरणात एरवी ऑगस्टमध्ये पावसाचे पाणी यायला सुरवात होते. मात्र, अनेक वर्षांनंतर जूनमध्येच धरणात नव्याने पाण्याची आवक या वर्षी होत आहे. आज धरणात 469 क्यूसेकने नवी आवक सुरू होती. मात्र, पाणी येत असतानाच डाव्या कालव्यातून 50 क्यूसेकने गळती सुरू होती.
घोड धरणातील पाणी महिनाभरापूर्वीच संपले. कालव्याच्या दरवाजातून होणाऱ्या गळतीबाबत "सकाळ'ने अनेक वेळा आवाज उठविला. त्यानंतर पाणबुड्यांच्या मदतीने काही काळ ही गळती कमी केली. मात्र, पुन्हा एकदा गळती होत असल्याचे समोर आले आहे. आता धरणात नवीन पाणी येणे सुरू झाले आणि गळतीही सुरू झाली. त्यामुळे सावळा गोंधळ समोर आला. धरणात आज 5 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला असला, तरी कालव्यातून गळतीद्वारे 50 क्यूसेक पाणी जात आहे. पाणलोट क्षेत्रातून आवक होत असली, आणि गळतीचा ठरावीक लोकांना फायदा होत असला, तरी इतर शेतकऱ्यांच्या मुळावर ही गळती येणार आहे.
पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील सूर्यवंशी म्हणाले, की कालव्याची गळती तातडीने बंद करावी. अशा पद्धतीने पाणी वाया गेले, तर त्याचा फटका लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बसतो. या गळतीची चौकशी करतानाच, उपयुक्त पाणीसाठा वाढल्यानंतर शेतीसाठी आवर्तन सुरू करावे. अहमदनगर
"घोड'च्या डाव्या कालव्यातून गळती होत आहे. ती बंद करणाऱ्या यंत्रणेला अनेक वेळा पत्रव्यवहार केला; मात्र त्यांनी दुरुस्ती केली नाही. गळती बंद करण्यासाठी पाणबुडे बोलविणार आहोत.
- दिलीप साठे, उपअभियंता
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.