
निवडणुक आयोगाने राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा पंचवर्षीक निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे.
कोपरगाव (अहमदनगर) : निवडणुक आयोगाने राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा पंचवर्षीक निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. कोरोनाच्या काळात राज्यातील अनेक ग्रामपंचायतीचींची निवडणुक मुदत संपली होती. त्यानुसार एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायती असुन त्यात कोपरगाव तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळा उडणार असल्याची माहीती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे. तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीमध्ये कोपरगाव मंडलातील जेऊर पाटोदा, जेऊर कुंभारी ,कोकमठाण, संवत्सर,ओगदी
रवंदा मंडलातील - अंचलगाव, येसगाव, नाटेगाव, टाकळी, सोनारी, रवंदा, मळेगाव थडी, सांगवी भुसार,मायगाव देवी.
दहेगाव बोलका मंडलातील - कासली, तिळवणी ,आपेगाव, उक्कडगाव.
सुरेगाव मंडलातील - कोळगाव थडी वेळापूर हिंगणी मढी बु. मढी खु. देर्डेचांदवड.
पोहेगाव मंडलातील - घारी, अंजनापुर, मनेगाव, धोंडेवाडी, काकडी - मल्हारवाडी यांचा सामावेश आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांनी 23 ते 30डिसेंबर 2020 पर्यंत उमेदवारी अर्ज सादर करावयाचा आहे. उमेदवारांच्या उमेदवारी अर्जाची छाननी 31 डिसेंबर रोजी सकाळी 11वाजता. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जानेवारी 2021 दुपारी 3 वाजे पर्यंत. उमेदवारांची अंतिम यादी व निवडणूक चिन्ह वाटप त्याच दिवशी दुपारी नंतर.
प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत तर मतमोजणी 21 जानेवारी 2021 रोजी होणार असल्याने तालुक्यातील 29 ग्रामपंचियतीवर नवीन वर्षाचे नविन कारभारी येणार आहेत.
संपादन : अशोक मुरुमकर