
-विनायक दरंदले
सोनई : शनैश्वर देवस्थान ट्रस्ट मालकीच्या भक्तनिवासातील अनेक खोल्यांची दुरवस्था असताना आणि गावात खासगी लाॅजमध्ये आवश्यक खोल्यांची संख्या नसताना विश्वस्त मंडळाने रात्रीचे दर्शन बंद केले. त्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, मुखदर्शन बंद केल्याने भाविक मुक्कामी राहू लागल्याने गावात आर्थिक उलाढाल वाढली आहे.