
पारनेर : ‘बीएसएनएल’च्या सेवेत अनेक त्रुटी असल्याने ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे ‘बीएसएनएल’ अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी (ता.१६) अहिल्यानगर येथे पार पडलेल्या बैठकीत खासदार नीलेश लंके यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत विविध सुविधांमधील त्रुटींबाबत जाब विचारला. यावेळी ‘बीएसएनएल’च्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष खासदार बजरंग सोनवणेही उपस्थित होते.