
पारनेर : वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व गड संवर्धन मोहीम रविवारी (ता.२५) रायरेश्वर गडावर राबविण्यात आली. भर पावसात शेकडो कार्यकर्त्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. मोहिमेसाठी पुढील काळात ‘आपला मावळा’ या नवीन सामाजिक संघटनेच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली.