Nilesh Lanke: मतदारसंघात मल्टिमोडल लॉजिस्टिक हब हवा : सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे नीलेश लंकेंची मागणी
श्रीगोंदे-कर्ज तालुके हे जेएनपीटी बंदरांशी रेल्वेने थेट जोडलेले आहेत. एम.एच. १६० महामार्ग शिर्डी, पुणे विमानतळ आदी दळणवळणाच्या सुविधा उत्तम उपलब्ध आहेत आदी बाबी मंत्री सोनोवाल यांच्या निदर्शनात लंके यांनी आणून दिल्या.
Nilesh Lanke meeting Sarbananda Sonowal to discuss the need for a multimodal logistic hubSakal
पारनेर : अहिल्यानगर-श्रीगोंदे-कर्जत परिसरात मल्टिमोडल लॉजिस्टक हब स्थापन करून पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवे बळ देण्याची मागणी केंद्रीय नौवहन, बंदर व जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे निवेदन देऊन खासदार नीलेश लंके यांनी केली आहे.