निळवंडे धरणही भरले, सोळाशे क्युसेकने विसर्ग

शांताराम काळे
Tuesday, 22 September 2020

तनवाडीत 60 मिलिमीटर, भंडारदरा 45, पांजरे 58, वाकी येथे 40 मिलिमीटर पाऊस झाला. भंडारदरा धरणही 100 टक्के भरले आहे. धरणातून 812 क्‍यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे भंडारदरा वीजनिर्मिती सुरु झाली आहे.

अकोले : निळवंडे धरण आज पहाटे 4 वाजता पूर्ण क्षमतेने भरले. जलाशयाची पाणीपातळी 648.160 मीटर, तर पाणीसाठा 8328 दशलक्ष घनफूट झाल्याने धरण शंभर टक्के भरल्याचे शाखा अभियंता अरविंद जाधव यांनी जाहीर केले.

वीजनिर्मितीसाठी व स्पिल-वेमधून 1600 क्‍यूसेकने विसर्ग सुरू आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. घाटघर येथे 66 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

रतनवाडीत 60 मिलिमीटर, भंडारदरा 45, पांजरे 58, वाकी येथे 40 मिलिमीटर पाऊस झाला. भंडारदरा धरणही 100 टक्के भरले आहे. धरणातून 812 क्‍यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे भंडारदरा वीजनिर्मिती सुरु झाली आहे.

वाकी जलाशयातून 197 क्‍युसेक्‍सने विसर्ग सुरू असल्याचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितले. तालुक्‍यातील सर्व 24 जलाशय भरले असल्याचे कार्यकारी अभियंता ए. इ. नानोर यांनी सांगितले. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Nilwande dam was also filled, discharging sixteen hundred cusecs

Tags
टॉपिकस
Topic Tags: