
अहिल्यानगर : कर्जत-मिरजगाव रस्त्यावरील पठारवाडी फाट्याजवळ दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्या नऊ आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून जीप, तलवार, लोखंडी कत्ती, मोबाईल, चाकू, असा सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी एका व्यापाऱ्याच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली देखील आरोपींनी दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.