
संगमनेर : तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांकमधील (६०) रुंदीकरणात संपादित जमीनधारक शेतकऱ्यांना न्याय देणार असून, लवकरच त्याबाबत सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पठार भागातील शिष्टमंडळाला दिले.