"नोबल'ने उभारला गरिबांसाठी इतक्‍या निधीचा अतिदक्षता विभाग

"Noble" has set up an intensive care unit for the poor
"Noble" has set up an intensive care unit for the poor

नगर ः शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कोरोनाबाधितांवर जलद गतीने उपचार होऊन रुग्ण लवकरात-लवकर सुखरूप घरी परतावा, या उद्देशाने अतिदक्षता विभाग वैद्यकीय सुविधांनी सज्ज करण्यात आला आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी आज दिली. 

जिल्हा रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना डॉ. कांडेकर म्हणाले, ""जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून विकसित केले असले, तरी तेथे उपलब्ध बेडची संख्या भविष्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत अपुरी पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या सेवेसाठी नोबल मेडिकल फाउंडेशनने पुढाकार घेऊन 30 लाख रुपयांच्या निधीतून जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने 20 बेडचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग कार्यान्वित केला आहे. या विभागाचे लोकार्पण रविवारी (ता. 12) सकाळी 11 वाजता आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे,  फाउंडेशनचे विश्‍वस्त डॉ. संगीता कांडेकर, डॉ. पांडुरंग डौले, डॉ. नानासाहेब अकोलकर, डॉ. विजय पाटील, डॉ. सुंदर गोरे, डॉ. सुनील बंदिष्टी यांचे योगदान आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, डॉ. सुनील पोखर्णा, डॉ. बापूसाहेब गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण झाले. फाउंडेशनने आजपर्यंत विविध सामाजिक कामांत सहभाग घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचे आशीर्वाद नेहमीच लाभलेले आहेत. नगरकरांसाठी ही नवी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून खारीचा वाटा उचलला आहे. याचे समाधान वाटत आहे. उद्‌घाटन सोहळ्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित राहणार आहेत. 

विभागातील अत्याधुनिक सुविधा 
- दहा व्हेंटिलेटर 
- 20 मल्टिपॅरा मॉनिटर्स 
- 20 बेड साइड ट्रॉलीज 
- डीफ्युब्रुलेटर्स 
- टेम्पररी पेसमेकर 
- नेब्यूलायझर 

संपादन ः विनायक लांडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com