
याचा लाभ परीसरातील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी केले.
पारनेर ः शेतक-यांचा माल विना कमिशन व तोही कमी किंमतीत थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच शेतक-यांना पिकविषयक मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामउत्कर्ष अॅग्रो प्रॉडूसर कंपणी फायदेशीर ठरणार आहे. या कंपणीमुळे शेतक-यांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
याचा लाभ परीसरातील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी केले.
रांजणागावमशीद येथे अप्पासाहेब देशमुख व परीसरातील शेतक-यांनी एकत्र येत ग्रामउत्कर्ष अॅग्रो प्रॉडूसर कंपणीची स्थापना केली तीच्या उदघाटन प्रसंगी औटी बोलत होते.
या वेळी क़ृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, पंचायत समितीसदस्य डॉ. श्रकांत पठारे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, राहुल शिंदे, माजी उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, शंकर नगरे, कृषी अधिकारी विलास गायकवाड, कंपनीचे अध्यक्ष अप्पासाहेब देशमुख आदी उपस्थत होते.
औटी पुढे म्हणाले, शेतकरी हितासाठी या कंपणीची उभारणी करण्यात झाली आहे यातून शेतकरी हीत जोपासावे तसेच शेतक-यांचा व ग्राहकांचा सुद्धा आर्थिक फायदा करावा. कंपणीने शेतकरी हितासाठी विविध उपक्रम भविष्यात हाती घ्यावेत असेही औटी म्हणाले.
आप्पासाहेब देशमुख या वेळी म्हणाले, शेतकरी व ग्राहक यांच्या मध्ये असणारा दलाल हाच मोठा होत आहे. कष्ट करणा-या शेतक-याच्या हातात काहीच पडत नाही उत्पदन खर्चही भागत नाही. व दिसरीकडे ग्राहकाचीही लुबाडणुक होत आहे त्या साठी शेतकरी हित डोळ्या समोर ठेऊन या कंपणीची स्थापणा केली आहे.
या पुढे शेतक-यांच्या हितासाठी शेतीविषयक मार्गदर्शन, पिक नियोजन,माती परीक्षण, मालाची विक्री व्यवस्था आदींसह इतर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या प्रसंगी दाते, शेळके, शिंदे यांचीही भाषणे झाली. या वेळी मोठ्या संखेने स्थानिक व परीसरातील शेतकरी उपस्थीत होते.