नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाला वरदान ठरलेले निळवंड धरण भरले

शांताराम काळे
Wednesday, 23 September 2020

नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाला वरदान ठरणारे निळवंडे जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे.

अकोले (अहमदनगर) : नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाला वरदान ठरणारे निळवंडे जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे. जलाशयाची पाणी पातळी ६४८.१६० मीटर तर पाणीसाठा ८३२८ दशलक्ष घनफूट झाल्याने हे जलाशय शंभर टक्के भरल्याचे शाखा अभियंता अरविंद जाधव यांनी सांगितले. 

वीज निर्मिती प्रकल्प व स्पिलवेमधून १६०० क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातही पाऊसाने जोरदार हजेरी लावली आहे. घाटघरमध्ये ६६ मिलीमीटर इतका पाऊस झाल्याने आतापर्यंत ६२२० मिलीमीटर २०५ इंच पाऊसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल रतनवाडी येथे ६० मिलीमीटर एकूण ४७६० मिलीमीटर २०० इंच भंडारदरा ४५, पांजरे ५८, वाकी ४० मिलीमीटर झाला आहे. 

भंडारदरा जलाशय देखील १०० टक्के भरले. जलाशयातून ८१२ क्युसेक्सने विद्युत ग्रहातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे भंडारदरा वीज निर्मिती सुरु झाली आहे. तर वाकी जलाशयातून १९७ क्युसेक्सने विसर्ग सुरु असल्याचे शाखा अभियंता अभिजित देश मुख यांनी सांगितले. तर तालुक्यातील सर्व २४ जलाशय भरले असल्याचे कार्यकारी अभियंता ए. इ. नानोर यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The northern of the Nagar district was filled with the Nilwand Dam which was a boon