तनपुरे नावालाच मंत्री, कामं तर मीच करतो, कर्डिलेंचा टोला

दत्ता इंगळे
Monday, 26 October 2020

नगर तालुक्‍यातील कापूरवाडी, बाराबाभळी, सोनेवाडी व मेहेकरी येथील शेतकऱ्यांना, जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून खेळत्या भांडवलाचे धनादेशाचे कर्डिले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

नगर तालुका ः ""माझ्याविरोधात निवडून आलेल्या उमेदवाराला ऊर्जा खात्याचे राज्यमंत्रिपद मिळाले असले, तरी विजेचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी माझ्याकडेच येतात. त्यांचे मंत्रिपद फक्त नावालाच आहे,'' असा टोला माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना लगावला. 

नगर तालुक्‍यातील कापूरवाडी, बाराबाभळी, सोनेवाडी व मेहेकरी येथील शेतकऱ्यांना, जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून खेळत्या भांडवलाचे धनादेशाचे कर्डिले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. 

कर्डिले म्हणाले, ""नगर-राहुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मी 10 वर्षे केल्यामुळे विकासकामांतून नागरिकांचा विश्वास कमावला आहे. त्यामुळे आजही मतदारसंघातील नागरिक विविध प्रश्न घेऊन माझ्याकडेच येतात. मी आमदार नसलो, तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवीत असल्यामुळेच, शेतकरी, तसेच सर्वसामान्य नागरिक माझ्याकडे येतात.'' 

जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, रघुनाथ लोंढे, अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, मनोज कोतकर, रावसाहेब साठे, बाबासाहेब जाधव, दीपक लांडगे, सुरेश सुंबे, शरद दळवी, दिलीप भालसिंग, प्रशांत गहिले, विलास शिंदे, कानिफनाथ कासार आदी उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not Tanpure, I am working - Kardile's revelation